शिवसेना खासदार यांच्यावर बलात्काराचा आरोप,पीडित महिलेची पोलिसांत लेखी तक्रार

0
61

मुंबई:- शिवसेनेच्या मुंबईतील खासदारावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रार दाखल केली आहे.मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे.मात्र, अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

काय म्हणाले राहुल शेवाळे?

महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्कर हा आरोप करण्यात आला असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझ्या विरोधात लेखी तक्रार

एका महिलेने दिली आहे. ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याचया उद्देशाने हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे.या संदर्भात पोलीस प्रशासन योग्य निर्णय घेईल असा मला विश्वास आहे. मी निर्दोष असून कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे. माझ्याविरोधात केलेल्या बोगस तक्रारीमागे कोण आहे याचाही पर्दाफाश लवकरच करेन असंही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.