शासकीय अधिकाऱ्यांवर हमला करणाऱ्यांवर कारवाई करा- मोहन पंचभाई

0
32

भंडारा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करा 

भंडारा:भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक फार मोठ्या प्रमाणात होत असून रेतीसाठी माफिया राज निर्माण होत आहे, या माफिया लोकांनी उन्माद माजविला आहे. अनेक ठिकाणी रेती माफियांनी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना मारझोड करण्याच्या घटना समोर येत आहेत. यांच्यापासून सामान्य जनतेला सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. हि बाब जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय आहे.
तसेच याव्यतिरिक्त जिल्ह्यात सटटा, जुगार, दारू सारखे अनेक अवैध व्यवसाय सुद्धा सुरु असून, हे सुद्धा बंद करणे गरजेचे आहे. याकरिता  जिल्हाधिकारी यांना भंडारा जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक व अवैध व्यवसाय बंद करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हमला, मारझोड करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.

काही लोक जाणिवपूर्वक कांग्रेसवर आरोप करतात, २०१५ पासून भंडारा जिल्ह्यात अवैध रेती व्यवसाय सुरु आहेत हा व्यवसाय भाजपच्या शासन काळात मोठ्या प्रमाणात वाढला असं देखील यावेळी सांगितलं गेलं.सदर निवेदन देताना भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई, राजू पालीवाल, धनंजय तिरपूडे, हेमंत कोरे, पृथ्वी तांडेकर, विनीत देशपांडे, विजय देशकर, कमल साठवने, योगेश गायधने, हंशराज गजभीये, मयूर खरवडे आदि उपस्थित होते.