वनविभागाने केली जप्तीची कारवाई

0
35

सडक अर्जुनी,दि.30ः- तालुक्यातील सितेपार (शिकारीटोला) येथील शेतीला लागून असलेल्या दुचन जंगलातील २0 सागवान जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ती झाडे खसरा ठेकेदारांनी कापल्याचे समोर आले. तक्रारीवरून वनविभागाने पंचनामे करून झाडे आपल्या ताब्यात घेतली आहे.
तालुक्यातील पांढरी परिसरात नवेगावबांध – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. या परिसरात मौल्यवान जातीची वनसंपदा आहे. त्याचा लाभ घेत नेहमी या परिसरातून मोठय़ा प्रमाणात मौल्यवान झाडांची कत्तल करुन लाकडांची तस्करी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांपूर्वी नागरिकांनी चोरून नेण्यात येणार्‍या लाकडांचे वाहन पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शिकारीटोला येथील फुलीचंद मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ असलेल्या दुचन जंगलातील गट क्र. ६७२ मधील सागवानाच्या २0 झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
माहिती मिळताच कोसमतोंडीचे वन क्षेत्रसहायक एस. झेड. वलथरे, वनरक्षक राम सिसोदे, रवी वैद्य, चुडामन पुस्तोडे, वनरक्षकमेळे, पुस्तोडे यांनी पंचनामा करून सागवानाची झाडे जप्त केली. झाडांची कत्तल खसरा ठेकेदाराने केली असून्न, त्याने वनविभागाची परवानगी न घेताच वृक्षतोड केल्याची माहिती आहे.