वाळू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार मायलेक ठार

0
68

भंडारा : जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शहापूर- सातोणा मार्गावर वाळूने घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात माय- लेकाचा जागीच  दुदैवी मृत्यू झाला. (bhandara accident news truck hit bike and two death)शहापूर- सातोणा मार्गावर झालेल्‍या अपघातात  मृतक गीता शामराव रहांगडाले (वय 55) व राजू राहगंडले (वय 26) हे दोन्ही माय- लेक लग्नसमारंभा करीता नागपूर येथून  गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा येथे जात असताना हा अपघात झाला. याची माहिती वरठी पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल होत, मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविले आहे.