वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

0
49

देसाईगंज,दि.03 – : तालुक्यातील चोप/कोरेगांव येथील युवकाला उसेगाव जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ठार केल्याची दुर्देवी घटना आज 3 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली.वाघाने युवकाला जंगलात नेताच गावकरी व वन विभागाचे अधिकारी/कर्मचार्यांनी जंगलात शोध मोहीम राबविली. तब्बल दीड दोन तासानंतर युवकाचे मृतदेह वन कर्मचारी यांना शोधण्यात यश मिळाले.सदर युवक देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथील असुन त्याचे नाव अजीत सोमेश्वर (सोमा) नाकाडे असल्याची प्राथमिक माहिती आहे.