शेळ्या चारणार्या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

0
62

तिरोडा,दि.03ः तालुक्यातील मुंडीकोटा येथील 25 वर्षीय युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.सदर मृत युवकाचे नाव रमेश गणपत शेंदरे असे आहे.या घटनेमुळे मुंडीकोटा गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सविस्तर वृत्त असे की, रमेश नित्याप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी मुंडीकोटा शेत शिवार रेल्वे रूळ ओलांडून गेला होता. बकऱ्यांना त्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यात शेजारी गेला असता त्याचा तोल जाऊन शेतळ्यात पडला. त्यामुळे त्यात त्याला जलसमाधी मिळाली.शेतशिवार निर्जन असल्याने त्याचे मदतीला कोणीच धावून गेले नाही.शेळ्या घरी परतल्या,त्यामुळे मुलगा मागोमाग येईल असे कुटुंबियांना वाटले. पण बराच काळ लोटून देखील मुलगा घरी न आल्याने कुटूबियांची चिंता वाढली.त्यानंतर शेतशिवारात शोध घेण्यास सुरवात केली.त्यातच एका शेततळ्या शेजारी पाण्याची पिशवी, पाण्याची बाटल पाळीवर दिसून आल्याने संशय बळावला. सायंकाळ झाल्याने मृतदेह मिळून आला नव्हता. आज दि.3 मे 2022 रोज मंगळवारला सकाळी 7.00 वाजता शेततळ्यात शोध घेण्यात आले असता त्याचा मृतदेह आढळला. मुंडीकोटा पोलीस दुरक्षेत्राचे जगत बर्वे, पीआय सुशील चौधरी, डोके नापोशी, पोलीस पाटील महेंद्रकुमार डोंगरे, कमलेश आथिलकर सरपंच, देवेंद्र मंडपे, रामेश्वर मोहतुरे, मनोहर ढबाले आणि अन्य गावकरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित होते. त्याचे उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. पुढील तपास तिरोडा पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.