टिप्पर व दुचाकीच्या अपघातात 2 ठार;1 जखमी;नागभीड ब्रम्हपुरी मार्गावरील घटना

0
47

टिप्पर व दुचाकीच्या अपघातात 2 ठार;1 जखमी

– संध्याकाळी होते चुलत भावाचे लग्न
नागभीड; नागभीड वरून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या एम.एच.40 बी.जी. 5441 या क्रमांकाचा टिप्पर व नागभीड जवळील चिखल परसोडी वरून नागभीड कडे येणाऱ्या एम.एच.31 बी.आर.1747 या क्रमांकाच्या दुचाकी चा नागभीड रेल्वे फाटक जवळ जोरदार अपघात झाला यात चिखल परसोडी येथील बोकडे कुटुंबातील भुषण शामराव बोकडे (२१),पवन विनोद बोकडे (15) यांचा जागीच मृत्यू झाला तर
गिरीश सुधाकर बोकडे (१६) हा गंभीर जखमी झाला.जखमी गिरीश ला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
मृतक भूषण बोकडे हा नागभीड येथील किराणा दुकानात काम करत होता आज घरी चुलत भावाचा संध्याकाळी लग्न असल्याने आज तो दुकानात आला नव्हता मात्र आपल्या चुलत भावंडासोबत काही कामानिमित्त नागभीड येथे दुचाकी ने येत असताना हा भीषण अपघात झाला यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वरील दोन्ही मृतकांचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उत्तरीय तपासनी साठी आणले आहेत.