भंडारा कारागृहात चार बंदिवानांची जेवन वाटप करणाऱ्या कैदयास मारहाण

0
133

जास्त भाजी मागण्यावरून वाद विकोपाला : भंडारा पोलीसात गुन्हा दाखल
भंडारा : जास्त भाजी मागण्यावरुन वादाला तोंड फुटलं अन् चार बंदिवानांनी जेवन वाटप करणाऱ्या कैद्यास लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारला भंडारा जिल्हा कारागृह वर्ग – १ मध्ये घडली. प्रकरणी चारही आरोपी विरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख रफिक शेख रहेमान, महेश आगाशे, मोहम्मद अफरोज शेख, राहुल पडोळे असे कारागृहात बंदिवानाला मारहाण करणाऱ्या चौघा बंदिवानांचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी बंदीवान देवेंद्र राऊत हे बॅरेक जबाबदार म्हणून बंदिवानांना भोजन वाटप करीत होते. यावेळी बंदीवान शेख रफिक शेख रहेमान याने प्रमाणापेक्षा जास्त भाजी मागितली. यावरून वाद घालून राऊत यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर महेश आगाशे, मोहम्मद अफरोज शेख, राहुल पडोळे हे बॅरेक धावून आले आणि त्यांनीही मारहाण केली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कराडे करीत आहे.