31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता मुंडीकोटाजवळ टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार,दोघे जखमी

मुंडीकोटाजवळ टिप्परच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार,दोघे जखमी

0
103

blank

तिरोडा,दि.29ः तिरोडा -तुमसर राज्यमार्गावरील मुंडीकोटा बसस्थानकाजवळ अज्ञात टिप्परने मोटारसायकलला MH 36 P6585 दिलेल्या धडेकत मोटारसायकलस्वार मुलगा जागीच ठार झाल्याची घटना आज 29 जुन रोजी सायकांळी 7.30 वाजता घडली.या घटनेत मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले आहेत.अपघातातील मृत मुलाचे नाव पियुष सुरेश कांबळी वय 12,राहणार घाटकुरोडा असे आहे.तर मृतकाचे वडील सुरेश कांबळी वय 40 यांच्या डोक्याला व हाताला मार लागला असून दुसरा मुलगा धुरुप कांबळी वय 15 याच्याही हात व पायाला मार लागल्याने त्यांना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर वृत्त लिहिपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.