पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर धाड | 2.11 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपींना अटक

0
46

तिरोडा, दि.2 : पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आज शनिवार,  02 जुलै 22 रोजी पोलीस अंमलदारासह खासगी वाहनाने  वडेगाव पोलीस चौकी परिसरात रामाटोली-सिल्ली येथील संजय बरेकर याच्या घराचे पाठीमागे रेड केले आहे. या धाडीत त्यांनी तब्बल 2 लाख 11 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 4 आरोपींना अटक केली. (अवैध दारू अड्ड्यावर धाड)

त्यामध्ये (1) संजय सोविंदा बरेकर वय 35 वर्ष रा. रामाटोली सिल्ली, (2) स्वप्ननिल हंसराज मेश्राम वय 23 वर्ष रा. भिवापूर, (3)अनमोल सुक्कल कडवे वय 35 वर्ष रा. निलागोंदी, (4)सत्यशील चिंधू बनसोड वय 35 वर्ष रा. ठाणेगाव हे दारूचा गुत्ता उघडून मोहफुल दारूची भट्टी लावून दारू गळताना रंगेहात मिळून आलेले आहेत. त्यांच्याजवळून खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केलेला आहे.चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध कलम 65(ब)(क)(ड), 68, 81, 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सोबत पोलीस अंमलदार पो हवा कवलपालसिंग भाटिया, नापोशी पुंडलिक उके, पोशी महेंद्र अंबादे, इरफान  शेख, चेतन शेंडे, मंथन ठाकरे यांच्यासह केलेली आहे. अश्याप्रकारे कोठेही अवैध धन्दे दिसून आल्यास पोलिसांना कळवावे. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी केले आहे.