सांगली बस डेपोच्या मालगाडीतून होत होती अवैध लाकूड वाहतूक…

0
19

रत्नागिरी | प्रतिनिधी

साखरपा वन तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आटपाडी जिल्हा सांगली एस टी डेपो ची माल वाहतूक गाडी (एम एच 14 BT 0626 )मध्ये इंजायली जातीचा कापीव माल मौजे तुळसणी ता संगमेश्वर येथुन कोल्हापूर गोकुळ शिरगाव येथे विना परवाना वाहातुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सुरज तेली वनरक्षक साखरपा नाका यांनी त्या गाडीचा पाठलाग करुन मालवाहतूक गाडी पकडली. खात्री केली असता कापीव लाकुड माल असल्याने चालक इराण्णा सतीश इंडे (३४) याच्याकडे वन विभागाचा वाहतूक परवाना आहे का या बाबत चौकशी केली असता वाहातुक परवाना नसल्याने चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील चौकशी करता चालक व मालवाहतूक गाडी ताब्यात घेतली आहे, या गुन्हे कामी मा दिपक खाडे विभागीय वनाधिकारी चिपळूण सचिन निलख सहायक वनसंरक्षक चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज तेली वनरक्षक तपासणी नाका साखरपा व वनरक्षक नानू गावडे,सागर गोसावी, संजय रणधीर यांनी कारवाई केली असून पुढील तपास तौफिक मुल्ला वनपाल देवरुख करत आहेत तसेच अशा प्रकारची विनापरवाना लाकुड वाहतूक होत असेल तर वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर किंवा नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन वनविभाग तर्फे प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रादेशिक यांनी केले आहे.