35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघाताच एकाचा मृत्यू

ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघाताच एकाचा मृत्यू

0
139

blank

चिचगडजवळील पिपरखारी य़ेथील घटना

चिचगड,दि.४.ः चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या पिपरखाली येथे सोमवारच्या(दि.3)रात्री आठ वाजेच्या  सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये आमोरा समोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृतकाचे नाव प्रल्हाद देवाची टेंभुर्णे (वय २०,राहणार हालमकुडो,तालुका चौकी(बाधां) जिल्हा राजनांदगाव) असे आहे.तर मृतकाच्या दुचीकावर मागे बसलेला किशोर कुंभरे राहणार सुंदरीदंड तालुका देवरी हा गंभीर जखमी झाल्याने त्यास गोंदियाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.ट्रॅक्टर क्रमांक M H-35 AQ-1384 व मोटर सायकल क्रमांक,CG 07-AR – 1751 गे दोन्ही वाहन पोलीस स्टेशन चिचगडला जमा करण्यात आले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पीएसआय मनोहर इस्कापे करीत आहेत.

blank