लहान भावाने मोठ्या भावाला कुर्‍हाडीने मारून जखमी केले

0
36

तिरोडा : घरगुती वादावरून लहान भावाने मोठ्या भावाला कुर्‍हाडीने मारून जखमी केले. ही घटना आज सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.15 वाजता ग्राम मुंडीकोटा येथे घडली.मार्कंड अर्जुन राऊत रा. मुंडीकोटा असे जखमी मोठ्या भावाचे नाव असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचार सुरू आहे. तर राजकंठ अर्जुन राऊत रा. मुंडीकोटा असे आरोपी लहान भावाचे नाव आहे.फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 307 अन्वये (जीव घेण्याचा प्रयत्न करणे) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत.