संपत चाललेल्या ग्रामीण लोककलेला जिवंत ठेवण्यात युवा पिढीचे विशेष योगदान : रविकांत खुशाल बोपचे

0
12

तिरोडा : तालुक्यातील ग्राम मारेगाव, बोरगाव, खुरखुडी, खेडेपार येथे दिवाळीच्या पावन पर्वावर मंडईनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते रविकांत बोपचे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी रविकांत बोपचे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असताना युवा पिढीने समोर येत ग्रामीण भागातील संपत चाललेल्या लोककलेला मंडईच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीने जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. यासह लोककलेला प्रोत्साहन देत हिरहिरीने भाग घेत आहेत. हे समाधानकारक व कौतुकास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन रविकांत बोपचे यांनी केले.

लोककला

उद्घाटन प्रसंगी रविकांत बोपचे, अनुप बोपचे, धर्मेंद्र तुरकर, अशोक अरोरा, मोरेश्वर ठाकरे, आर.सी. कटरे, एकनाथ उके, शिला बिसेन, प्रकाश रहांगडाले, अतुल भुते, डॉ.तारेंद्र बिसेन, राजेश देशभ्रतार, तिलक रहांगडाले, सुरजलाल ठाकरे, पप्पू चौधरी, किशोर रहांगडाले, सोनू चौहान, बन्सीलाल बिसेन, नत्थु ठाकरे, धर्मदास वंजारी, अनिल बोपचे, विजय उमरकर, सुनील बोपचे, जितू बोपचे, महेंद्र पटले, प्रमोद देशमुख, पोतनलाल बोपचे, छोटेलाल तुरकर, मदनलाल बोपचे, सुनंदा उमरकर, शामराव बिसेन, छोटेलाल बिसेन सहित मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.