सावकाराला दम देण्यासाठी चोरले रिव्हॉल्व्हर आणि ३५ काडतूस

0
27

भंडारा-कर्जबाजारीला त्रस्त होऊन भंडारातील एका पोलिस शिपायाने सावकाराला दम देण्यासाठी भंडारा न्यायालयाच्या पोलिस गार्ड रुममधून चक्क एक रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस चोरले. पोलिस दलात खळबळ उडविणार्‍या या घटनेच्या चौकशीअंती त्या पोलिस शिपायाला अटक करुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली रिव्हॉल्व्हर व काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
नीलेश खडसे रा. गणेशपूर, असे अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. नीलेश हा भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल कक्षात तैनातीवर होता. घटनेच्या दिवशी आरोपी निलेशची ड्युटी नसताना तो गार्ड रुममध्ये बॅग घेऊन आला व ५ मिनिट थांबून शस्त्रांची तपासणी करून बॅगसह निघून गेला. दरम्यान त्या कक्षातील सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली 0.३८ शासकीय रिव्हॉल्व्हर आणि ९ एमएमचे ३५ काडतूस चोरी गेल्याचे लक्षात येताच सुनील सयाम यांनी ही माहिती पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षकांना दिली. राखीव पोलिस निरीक्षकांनी चोरीची खातरजमा केल्यानंतर पोलिसात तक्रार केली. पोलिस अधीक्षकांना घटनेची माहिती मिळताच तपासाला गती देण्यात आली. तेथील कर्मचार्‍यांचे बयान नोंदविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिस नाईक निलेशच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन त्याचीच उलटतपासणी घेतली. अखेरीस त्याने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याने चोरलेली रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस जप्त केले आहेत. त्याला अटक करण्यात आली