शिक्षक पंतसंस्थेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलचा एकहाती विजय,विकास पॅनलचे वर्चस्व संपुष्ठात

0
59

गोंदिया,दि.01ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांची अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणार्या प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जाहीर झाला आहे. दरम्यान शिक्षक मतदारांनी यावेळी गेल्या दोन दशकापासून पतसंस्थेवर वर्चस्व कायम ठेवलेल्या विकास पॅनलचा धुव्वा उडवित सहकार पॅनलने एकहाती विजय मिळविला.विशेष म्हणजे विकास पॅनलच्या पराभवासाठी प्राथमिक शिक्षक संघाचे झालेले दोन तुकडेच कारणीभूत ठरले.तर सहकार पॅनल असलेल्या शिक्षक समितीने मात्र एकी कायम ठेवल्याने संघ विरुध्द संघाच्या या लढाईत समितीने विजय मिऴविला.

विकास पॅनलच्या सत्तारुढ संचालकावर झालेले आरोप आणि प्राथमिक शिक्षक संघातील मतभेदाचा लाभ घेत शिक्षक समितीच्या सहकार पॅनलला पतसंस्थेची सत्ता शिक्षकांनी सोपवत प्रास्थापित शिक्षक संघाच्या विकास पॅनलला धक्का दिला. विशेष म्हणजे संघर्ष पॅनलने चांगलेच समिकरण बिगडविले. शिक्षक समितीच्या सहकार पॅनलचे १३ पैकी ११ उमेदवार विजयी झाले तर संघाच्या विकास पॅनलला फक्त २ जागांवर समाधानी व्हावी लागले.यात संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र कटरे यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला हे विशेष.
गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था र्मया.ची निवडणूक अत्यंत चुरसीची पहावयास मिळाली. पंत संस्थेच्या एकूण १३ संचालक पदासाठी ४२ उमेदवारांनी भाग्य आजमाविले. विशेषत: प्रस्थापित प्राथमिक शिक्षक संघाचे विकास पॅनल शिक्षक समितीचे, शिक्षक समितीचे सहकारी पॅनल तर शिक्षक संघाचा एक गट व इतर संघटनांचा संयुक्त संघर्ष पॅनल या तिघांमध्ये लढत पहावयास मिळाली. ३0 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात एकूण ९ मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण ३२३९ शिक्षक मतदार असलेल्या पत संस्थेच्या निवडणुकीसाठी २८९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास ९0 टक्के मतदान झाले. दरम्यान स्थानिक जे.एम. पटेल विद्यालयात मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्रासमोर सकाळपासून शिक्षक मतदार आणि उमेदवारांच्या सर्मथकांची गर्दी पहावयास मिळाली. गोंदिया पंचायत समिती क्षेत्रातील मतांची मोजणी सुरु होताच सुरुवातीला शिक्षक संघाच्या विकास पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तसेच तिरोडा आणि गोरेगाव या तीन पंचायत समिती क्षेत्रामध्ये विकास पॅनलच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यामुळे मोठा उत्साह दिसून आला. मात्र उर्वरित ५ पंचायत समिती क्षेत्रातील शिक्षक मतदारांनी चक्क संघाच्या विकास पॅनलला नाकारून समितीच्या सहकारी पॅनलवर विश्‍वास दर्शविला. सायंकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणी प्रक्रिये दरम्यान दुपारी ३ वाजेनंतर सहकारी पॅनलच्या उमेदवारांनी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांवर आघाडी घेतली. अखेर निकाल जाहीर होता, शिक्षक मतदारांनी प्रस्थापित शिक्षक संघाच्या पॅनलला चांगलाच धक्का दिल्यास समोर आले. प्रस्थापित पॅनलला फक्त दोन जागांवर समाधानी व्हावे लागले.संघर्ष पॅनलला एकही जागा मिळाली नसली तर या पॅनलने निवडणूक लढविल्यामुळे संघाला चांगलाच फटका बसल्याचे समोर आले.

जिल्हास्तर विजयी उमेदवार
* इमाव प्रवर्ग- तिडके संदीप ईश्‍वरदास (सहकार पॅनल)
* अनु जाती/जमाती प्रवर्ग-बडोले विनोद पुरणदास (सहकार पॅनल)
* विभाज प्रवर्ग-बोपचे राजेंद्र मनिराम (सहकार पॅनल)
* महिला राखिव-डहाट नितू युवराज (विकास पॅनल)
* महिला राखीव – तिडके भारती दिनेश (सहकार)                                                                      पं.स.स्तरीय विजयी उमेदवार
* गोंदिया- बांते गौतम मधुकर (सहकार पॅनल)
* तिरोडा- बिसेन अशोक धोडुजी (सहकार पॅनल)
* गोरेगाव- रहांगडाले उमेश शिवनाथ (सहकार पॅनल)
* आमगाव- ठाकुर शोभेलाल धनलाल (सहकार पॅनल)
* देवरी- रामटेके राजेश आबाजी (विकास पॅनल)
* सालेकसा- दमाहे सत्यनारायण भिवराम (सहकार पॅनल)
* सडक अर्जुनी- डोंगरवार किशोर बाळा (सहकार पॅनल)
* अर्जुनी/मोर.- लोधी दिलीप श्रीराम (सहकार पॅनल)