दोन लाखाची लाच घेत अभियंता ACB च्या जाळ्यात

0
62

चंद्रपूर दि.02-: केलेल्या कामाचे देयके देण्यासाठी ठेकेदाराकडून दोन लाख रूपयाची लाच मागणा-या जिवतीच्या सार्वजर्व निक बांधकाम विभागाचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकला.अनील शिंदे असे अभियंत्याचे नाव आहे.
मुंगसाजी कन्स्ट्रक्शन कपंनी यवतमाळने जिवती तालूक्यात पूल बांधकामाचे काम घेतले होते.तेसदर बांधकाम ठेकेदाराने केले.एक कोटी रूपयाचे असलेल्या कामाचे चार बिलापैकी दोन बिल मंजुरीकरिता पाठविण्यासाठी व दोन बिले तयार करून पाठविण्यासाठी अभियंत्याने ठेकेदाराकडे दोन लाख रूपयाची मागणी केली.तक्रारकर्त्याची लाच द्यायची मुळीच इच्छा नव्हती.त्यामुळ त्यांनी एसीबीकडे याप्रकाराची तक्रार केली. एसीबीने पळताळणी करून अभियंता शिंदे याला सापळा रचून लाच घेतांना रंगेहाथ पकडले.