सोने, चांदीचे दागिने चोरणार्‍या आरोपीला अटक

0
41

भंडारा-तुमसर येथील कुंभारे नगर येथे कुटूंबासह बाहेर गावी गेल्याचे व घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून आरोपीने घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली त्या घटनेचा तपास तुमसर पोलिसांनी करुन एका आरोपीला अटक करुन चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. धम्मशाली राजेश चौधरी (३५) रा.जरीपटका नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
तुमसर येथील कुंभारे नगरातील विक्रांत देवदास बन्सोड (३३) हे आपल्या कुटूंबासह बाहेर गावी गेले होते. अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी सुना मौका पाहुन घराचे दार उघडे पाहुन घरात प्रवेश केला. घरातील बेडरुमधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख करुन चोरुन नेली. याघटनेची तक्रार विक्रांत बन्सोड यांनी तुमसर पोलिस स्टेशनला दिली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी निती पुडी रस्मीताराव यांच्याशी घटनेबाबत सविस्तर चौकशी केली व दिलेल्या निर्देशावरुन तुमसर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक यांनी पथक तयार केले. चोरट्याचा मागावर लागले. तपास करित असतांना तुमसर पोलिसांनी एक संशयीत धम्मशाली राजेश चौधरी (३५) रा.जरीपटका नागपूर याला ताब्यात घेतले. त्याला सविस्तर विचारपुस केली असता त्याने चोरी केल्याचे कबुल केले. आरोपी धम्मशाली चौधरी याचे कडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल व रोख पोलिसांनी जप्त करुन आरोपीला अटक केली. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात तुमसर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन चिंचोळकर, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, सहायक फौजदार ओमप्रकाश चिचखेडे यांनी केली आहे.