अतिक्रमणावर नगरपंचायतचा हातोडा; रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास

0
25

देवरी-शहरातील चिचगड रोड परिसरातील अतिक्रमण देवरी नगरपंचायतने (दि.३) हटवले. मागील अनेक महिन्यांपासून चिचगड रोड मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. परिणामी वाहन चालकानां रस्त्याने वाहन चालवतांना मोठ्या प्रमाणात आठवडी बाजाराच्या दिवसी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. तर दुसरीकडे चिचगड रोड वर असलेला वनविभागाचे कार्यालया समोरील परिसर अतिक्रनाच्या सावटात सापडलेला आहे. अखेर नगरपंचायतने मुख्य रस्त्यावरची छोटी-छोटी दुकाने व हातगाडे हटवल्या मुळे चिचगड रोडाने मोकळा श्‍वास घेतल्याचे चित्र पहायला मिळाले.
चिचगड रोड मुख्य मार्गावर मागील अनेक महिन्यापासून वाढते अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भाने नागरिकांमधून मागणी होत होती. अखेर आज देवरी नगरपंचायतने देवरी शहराच्या चिचगड रोडवरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात पुढाकार घेतला व चिचगड रोड मुख्य परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. नगरपंचायतने केलेला या कारवाई संदर्भात देवरीकर व वाहनचालकानीं समाधान व्यक्त केले असून शहरातील इतर मार्गावरील अतिक्रमण देखील तात्काळ हटवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.