40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

0
51

blank

गोंदिया-जिल्ह्यात दररोजी ठिकठिकाणावरून मोटारसायकल लंपास होत असल्याची तक्रार पोलिस ठाण्याला प्राप्त होत असतात. दरम्यान चोरी प्रकरणातील पाच मोटारसायकल आरोपींकडून जप्त करून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची घटना शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजीची आहे.
सविस्तर असे की, शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोंदिया ग्रामीण, रावनवाडी, परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग व चोरी / घरफोडी मोटार सायकल चोरी करणारे गुन्हेगार शोध घेत असतांना गुप्त माहितीच्या आधारावर माहिती मिळताच विनायक नेवारे रा. गिरोला यांच्याकडे चोरीची मोटार सायकल आहे व तो दासगाव / किन्ही परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थागुशाच्या पथकाने त्याचा शोध घेवून त्याला दासगांव किन्ही परिसरातुन ताब्यात घेतले. दरम्यान, मोटारसायकल चोरीची विचारपूस केली असता, त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन ग्राम नवेगाव, किरणापूर, लांजी सर्व जि.बालाघाट येथुन तसेच त्याचा मित्र विधीसंघर्षित बालक याचे सोबत मिळुन ग्राम लांजी, ता. जि. बालाघाट (मध्यप्रदेश) येथुन तसेच पो. स्टे. रावणवाडी परिसरातून मो. सा. चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी माहितीच्या आधारावर आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई अपर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड, पो. हवा. राजेंद्र मिर्शा, भूवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, पोना महेश मेहर, पोशी. संतोष केदार, विजय मानकर , चापोशि पांडे यांनी पार पाडली.