भरधाव टॅंकर-प्रवासी आटो व पल्सरचा विचित्र भीषण अपघात. -दोन जण ठार,8 जण जखमी.

0
26

तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्दजवळ अपघात
अमरावती, दि.7 : भरधाव टॅंकर,प्रवासी आटो व पल्सर दुचाकीच्या विचित्र भीषण अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द जवळ आज 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताचे घडली.
प्राप्त माहितीनुसार, टॅंकर क्रमांक MH 43,U-8405,प्रवासी आटो क्रमांक MH 27,BW-3833 व पल्सर दुचाकी क्रमांक MH 27,D-9543 या तीन वाहनांमध्ये भीषण अपघात घडला आहे.त्यात प्राथमिक माहीतीनुसार सोमाजी तापाजी कोरडकर(रा.घोटा),कैलास वाघमारे(वय 50,रा.शेंदुरजना बाजार,ता.तिवसा) असे मृतक इसमाचे नाव आहे.तर जखमीमध्ये ,शीतल माटे(वय 25,रा.जळका ),रेखा वाघमारे(50,शेंदुरजना बाजार),रौनक विशाल तेलंग(6,रा.हिंगणघाट),श्रीकृष्ण वाघमारे(32,शेंदुरजना बाजार),आरोही तेलंग(4,शेंदुरजना बाजार),श्वेता सविता शेंदरे(28,तिवसा),दीप्ती शेंदरे(तिवसा),विराट शेंदरे(तिवसा),प्रांजली गौरखेडे (तिवसा)अशी जखमींची नावे आहे.
कुऱ्हा मार्गावर असलेल्या वाठोडा खुर्द गावाजवळ सदर अपघात झाला असून प्रवासी आटो,टॅंकर व एक पल्सर दुचाकी या तीन वाहनांमध्ये हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजताचे सुमारास घडला आहे.मात्र हा अपघात नेमका झाला कसा?याबाबतची माहिती वृत्त लिहेस्तोवर मिळू शकली नाही.घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.तर अपघातानंतर टॅंकर पळून गेला असता त्यास कुऱ्हा पोलिसांनी पकडले. अपघातातील गंभीर जखमी पाच जणांना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.जखमीमध्ये 2 लहान बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.