43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता लाचखोर पोलिस हवालदारास अटक

लाचखोर पोलिस हवालदारास अटक

0
44

blank

गडचिरोली-पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात अटक करुन जेलमध्ये न पाठविण्याच्या व जमानत देण्याच्या कामाकरिता साडेतीन हजाराची लाच स्विकारतांना गडचिरोली पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवार ३ डिसेंबर रंगेहाथ अटक केली आहे. शकील बाबू सय्यद (५0) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे.
लाचलुपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या आतेभावास अटक करुन पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. दाखल गुन्ह्या प्रकरणी जेलमध्ये न पाठविण्याचे तसेच जमानत मिळवून देण्याकरिता पोलिस हवालदार शकील सय्यद यांनी साडेतील हजाराची मागणी केली होती. परंतु तक्रारदार लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीअंती एसीबीच्या पथकाने सापळा रचला. स्थानिक पोलिस ठाण्यातील तपास कक्षात सदर रक्कम स्विकारताना पोलिस हवालदारास रंगेहाथ अटक करण्यात आली. लाच स्विकारल्या प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसरे, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, राजु पद्मगिरीवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकुर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, विद्या म्हशाखेत्री, तुळशिराम नवघरे आदींनी पार पाडली.

blank