40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home शैक्षणिक शिक्षणाधिकारी पोहोचले दिव्यांग मुलीच्या घरी !

शिक्षणाधिकारी पोहोचले दिव्यांग मुलीच्या घरी !

0
49

गोरेगाव-3 डिसेंबर हा संपुर्ण जगात दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी दिव्याग मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याच निमित्ताने आज गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ महेन्द्र गजभिये गोरेगांव येथील इंदिरा नगर भागात राहणाऱ्या समीक्षा या दिव्यांग मुलीच्या घरी सकाळी भेटायला जाऊन तीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विभाग प्रमुख विजय ठोकणे, विस्तार अधिकारी ज्ञानेश दिघोरे, जिल्हा समन्वयक कु.कुलदिपिका बोरकर, तालुका समन्वयक जगदीश राणे, विशेष शिक्षिका सारिका चंदेल, साधन व्यक्ती सतीश बावनकर व सुनील ठाकूर उपस्थीत होते.
यावेळी विशेष शिक्षिका चंदेल यांनी शिक्षणाधिकारी यांना दिव्यांग समीक्षा ला देण्यात येणार्या सोयी सुविधांची माहिती दिली. तसेच तिला फिजिओथेरपी अत्यावश्यक असल्याचे सांगून पालकांना याबाबत प्रशिक्षित करत असल्याचे सांगितले.