जिल्हाधिकाऱ्याच्या गनमॅनची एके-४७ पळविणाऱ्या भावंडाना पाच वर्षाचा सश्रम कारावास

0
27

गोंदिया : वडीलाची प्रकृती पाहण्यासाठी मूळ गावी गेलेल्या जिल्हाधिकारी यांचे गनमॅन पोलीस शिपायाच्या कारंजा येथील हिमगीरी लेआऊट येथे असलेल्या खोलीतून एके-४७ पळविलेल्या दोन भावंडाना प्रत्येकी पाच
वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी ३ हजाराचा दंडाची शिक्षा गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी १६ डिसेंबर रोजी केली.गोंदियाच्या कारंजा येथील हिमगिरी ले आउट, प्लॉट क्र. ६३ येथे राहणारे पोलीस नायक ज्ञानेश्वर बकीराम औरासे(४२) बक्कल नंबर ६८८ हे ८ फेब्रुवारी २०१४ पासून गोंदिया जिल्हाधिकारी यांचे गनमॅन म्हणून काम करीत होते. २१ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांना त्यांच्या भावाचा फाेन आला व वडिलाची प्रकृती बरी नसल्याचे सांगितल्यामुळे ते वडीलांना पाहण्यासाठी देवरी येथे गेले होते. जातांना त्यांने पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथील खोलीवर जिल्हाधिकारी यांच्या संरक्षणासाठी मिळालेले ए.के ४७ रायफल बट क्र. १३६ व जिवंत १२० काडतूस ठेवले होते.त्यापैकी ६० काडतूस,ए.के ४७ रायफल,त्यांच्या पत्नीला २० ग्रॅम वजनाचा जुना वापरलेला हार किंमत ४० हजार, दोन कानातील टॉप्स ६ ग्रॅम वजनाचे किंमत १२ हजार असा ५२ हजाराचा माल आरोपी मनोहर योगेश्वर फरकुंडे (२२) व जितेंद्र योगेश्वर फरकुंडे (२९) दोन्ही रा.भोसा ता.आमगाव यांनी चोरले होते.या संदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबंर २०१४ ला भादंविच्या कलम ४५४,४५७,३८०,४११,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे,प्रवीण नावडकर,उमेश गिते यांनी केला होता.या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या समोर १२ साक्षदार तपासण्यात आले.मिळालेल्या पुराव्याच्या आधारे
मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी आरोपींना दोन कलमांत प्रत्येकी ५ वर्षाचा सश्रम कारावास सुनावले.या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुरेश रामटेके यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखील पिं गळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार रामलाल किरसान,ओमराज जामकाटे यांनी काम पाहिले.