तुमसरच्या रेल्वेउड्डाण पुलावरील अपघातात सीआरपीएफ महिला जवान ठार

0
86

तुमसर,दि.16ः भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे तुमसर रोड रेल्वेस्थानकावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलावर आज सायकांळच्या सुमारास दोनदुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एका दुचाकीवरील महिला सीआरपीएफ जवान हिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत महिला सीआरपीएफ जवानाचे नाव कु.किरण सुखदेव आगाशे रा.निलज असे आहे.किरण ही आपल्या भावासोबत दुचाकीने तुमसरला साहित्य खरेदीकरीता गेली होती.बाजार करुन गावाकडे परत येत असताना उड्डाणपुलावर एकादुचाकी चालकाने कट मारल्याने किरणच्या भावाचा तोल बिघडला व दुचाकीसह खाली पडले.यात किरणच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.तर किरणच्या भावाच्या डोक्याला मार लागल्याने भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सदर प्रकरणाचा तपास तुमसर पोलीस करीत आहेत.या उड्डाणपुलावर या आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.