
गोंदिया,-तालुक्लुयातील ढाकणी शिवारात वाटमारी करुन चारचाकी वाहनातूनतू रोख पळविणार्या अज्ञात आरोपींना अटक करुन शहर पोलिसांनी जप्त केलेली रक्कम संबंधिताला परत केली.नागपूर येथील धमेंद्र सोरते हे आपल्या वाहनाने 21 जुलै रोजी ढाकणी परिसरातून जात असताना चार अज्ञात इसमांनी वाहन थांबविले व जबरीने वाहनातील 60 हजार रुपये असलेली बॅग, वाहनाचे कागदपत्र, रसिद पावत्या घेऊन पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. दरम्यान तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील आरोपी राजकुमार उर्फ राज शिवशंकर
विश्वकर्मा(25) रा. सावराटोली व इतर आरोपींना अटक केले. तसेच चोरी केलेल्या रक्कमेपैकी 44,490 रुपये आरोपींकडून जप्त केले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेली रक्कम 17 डिसेंबर रोजी पोलिस निरिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याचे उपस्थितीत सपोनि सागर पाटील, पोउपनि सैदाने यांचे हस्ते सुपुर्द नाम्यावर सोरते यांना देण्यात आली.