सालेकसा पोलिसांची अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

0
13

गोंदिया,दि.23ः- सालेकसा पोलीसांनी  पोलीस ठाणे क्षेत्रात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाळू चोरीचा व्यवसाय करणाऱ्यांवर छापा कारवाई करुन दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह, दोन ब्रास वाळू जप्त करीत संबधित वाहनावर कारवाईकरीता महसुल विभागाला सोपवले आहे.
जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून कोणताही अधिकृत परवाना नसतांना वाळू, गौण खनिजाची चोरी करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देशांन्वये तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव विजय भिसे यांचे मार्गदर्शनाखाली सालेकसा येथील पोलीस पथक यांनी दिनांक-21/12/2022 चे 23.00 वा ते दिनांक- 22/12/2022 रोजी चे 05.00 वा चे रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना सोनारटोला ते गिरोला जाणाऱ्या रोडवर ग्राम बोदलबोडी येथे अवैध रेती वाहतुक करतांना दोन ट्रॅक्टरला पकडले.यामध्ये ट्रॅक्टर क्र. MH35G7536 व ट्रॉली विना क्रंमाकाची व MH35/AG-1264 व ट्रॉली क्र. MH 35/5918 वाळूची वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर दोन्ही ट्रॅक्टर व रेतीने भरलेली ट्रॉली असा मुद्देमाल ताब्यात घेवुन ट्रॅक्टर पो. स्टे. सालेकसा येथे आणण्यात आले. सदर दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीवर तसेच ट्रॅक्टर मालक राहुल हिरालाल साठवणे वय ३१ वर्ष रा. आमगाव खुर्द सालेकसा ता. सालेकसा जि. गोदिया,रमेश शरद फुंडे वय ५२ वर्ष रा. आमगाव खुर्द सालेकसा ता. सालेकसा जि. गोदिया यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी सालेकसा यांना पत्र देण्यात आले आहे.ही कारवाई पो.स्टे.सालेकसाचे ठाणेदार जनार्दन हेगडकर, पो. शि. अजय इंगळे/2102, चा.पो.शि. अतुल अग्निहोत्री/1686 यांनी केली आहे.