मूल येथील १९ लाखांच्या जबरी चोरीचा तपास

0
13

चंद्रपूर-उधारीची रक्कम वसुली करून दुचाकीने परत येत असलेल्या दोन दिवाणजींचा अज्ञात दुचाकीस्वारांनी पाठलाग करून दुचाकीचे हॅण्डल पकडून खाली पाडले व मारहाण करून रोकड लंपास करणार्‍या दोन आरोपींना पकडण्यांत जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल दहा महिन्याने गळाला लागलेल्या दोन आरोपींना सावली येथील दिवाणी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दिनेश प्रकाशचलाख (वय ३३) रा. सिंतळा मूल व त्यांचा मित्र अक्षय विलासगोवर्धन (वय २७) रा. शिवाजीनगर वॉर्ड क्र. १७ मूल, जि. चंद्रपूर हे दोघे त्यांचे मालक दिनेश गोयल यांच्या महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीची विविध ठिकाणावरून वसुली करून परत येत असताना चंद्रपूर-मूल रोडवरील जानाळा ते डोणी फाट्याजवळ मागून येणार्‍या मोपेड मोटार सायकलवरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या गाडीचे हॅन्डल पकडून खाली पाडले व त्यांना मारहाण करून त्याच्याजवळील १८,९३५२0 रु.ची नगदी रोकडची बॅग जबरीने हिसकावून घेऊन गेले, अशा फिर्यादींच्या तक्रारीवरून पो.स्टे. मूल येथे अप.क्र. १५४/२0२२ कलम ३९४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा तपास पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे देण्यात आला. २0 जानेवारी २0२३ रोजी खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मूल येथील केतन अशोक बुटले (वय २३), तोहीद आरीफ शेख (वय २४) दोन्ही रा. वॉर्ड नं. १७ ताडाळा रोड मूल, जि. चंद्रपूर यांनी गुन्हा केला आहे. त्या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, सुभाष गोहोकार, पो.कॉ. सतीश बगमारे यांचे पथक गठीत करून नमूद आरोपींवर गोपनीय पाळत ठेवली असता ते मिळून आले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरीचे रोकडमधून खरेदी केलेली ४ लाख रु.ची एक चारचाकी लाल रंगाची वरणा जुनी वापरती वाहन क्र. एम.एच. ४0 एसी ६३५४, २ लाख २५ हजार रु.ची एक जुनी वापरती खाकी रंगाची बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. ३४ बीएस ८३३३ तसेच गुन्ह्य़ात वापरलेले वाहन एक लाख रु.ची एक जुनी लाल रंगाची मारोती ८00 वाहन क्र. एम.एच. ३१ झेड ३७८९ मालमत्ता आरोपींकडून हस्तगत करण्यात आली.
आरोपींचा पीसीआर घेऊन उर्वरित मालमत्ता हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी, जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बल्की, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, पो.कॉ. सतीश बगमारे यांनी केली असून, गुन्ह्य़ाचा पुढील तपास बाळासाहेब खाडे करीत आहे.