विना परवाना दारू वाहतूक करणार्‍या वाहनाला पकडले

0
20

अर्जुनी मोर : जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने २१ जानेवारीच्या रात्री सापळा रचून अवैधरित्या (विना परवाना) दारू वाहतूक करणार्‍या चारचाकी वाहनाला पकडण्यात आले. याप्रकरणी ३१ हजार ५00 रुपए किंमतीच्या देशी दारूसह २ लाख ३१ हजार ५00 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गणेश चंद्रमौली सिल्लेवार विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अर्जुनी मोरगाव येथून विना परवाना दारू वाहून नेली जात आहे. अशी खात्रीशिर माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. दरम्यान सापळा रचून मोरगाव मार्गावर मारोती कार क्र.एमएच-0२/सीवी-९६६१ ला थांबविण्यात आले. वाहनाचे चालक गणेश चंद्रमौली सिल्लेवार याला वाहनात काय आहे, असे विचारले असता त्याने टाळाटाळ केली. यावर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये देशी दारूच्या बाटलांचे ९ बॉक्स दिसून आले. त्याचप्रमाणे त्याच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यावरून एकूण २ लाख ३१ हजार ५00 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी गणेश सिल्लेवार याच्याविरूध्द अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात कलम ६५ ई, ७७ अ, ८0 व दारूबंदी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
आरोपीला अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई विशेष पथकाचे पोहवा सुजीत हलमारे, महेश मेहर, शैलेश निनावे, दया घरत, हरीकृष्ण राव यांनी केली.