सार्वजनिक महिला शौचालयात आढळला नऊ वर्षाच्या बालकाचा मृतदेह,पंढरपूर हादरलं

0
11

पंढरपूर- महिलांसाठी बांधण्यात आलेल्या आणि सध्या बंद अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये 9 वर्षाच्या बालकाचा मृतदेह सोमवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या बालकाच्या मृतदेहाची चिरफाड झाल्याने हा खून आहे की दुसरे काही याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अतिशय धक्कादायक असलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शहरातील संतपीठ भागातील जगदंबा वसाहतीमध्ये राहणाऱ्या तिमा पांडूरंग धोत्रे यांचा नऊ वर्षाचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी किंवा नातेवाईकांच्या घरी आला न आल्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरातील मंडळी करत होते. रात्री तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाजवळून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना हा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल

त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याचा शरीरातील नरड्याखालील भाग ते बेंबीपर्यंत भाग गायब होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सी. व्ही केंद्रे, कपिल सोनकांबळे, आकाश भिंगारदेवे या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादा माने, सचिन इंगळे, बिपीन ढेरे, शरद कदम, राकेश लोहार, शहाजी मंडले, सुनील बनसोडे हे घटनास्थळी पोहोचले.

परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट

या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट असल्याने अशा प्राण्यांनी त्याला जखमी करून त्याच्या शरीराचा भाग खाल्ला असल्याने कृष्णाचा मृत्यू झाला का? अशी शंका आता पुढे येऊ लागली आहे. तर कृष्णावर डुकराचा हल्ला नसून त्याचा घातपात झाला असावा, अशी शंका नागरिक व्यक्त करू लागल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरली

दरम्यान पोलिसांनी या सर्व प्रकारची सखोल चौकशीला सुरुवात केली असून एखादा सीसीटीव्ही फुटेज मिळतोय का याचाही तपस पोलीस करू लागले आहेत. या प्रकरणाने परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरली आहे. या घटनेनंतर लहान मुलांची पालकांना मोठी काळजी वाटू लागली आहे.