गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार?कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
14

सातारा –लावणी क्वीन म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत.मात्र, आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा कोर्टाने दिले आहेत.

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या अनेक कार्यकामांमद्धे प्रेक्षकांनी हैदोस घातला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.

गौतमी पाटील हीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी गौतमी वर लावणी क्षेत्रातील अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.

गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, लोकांना घाणारडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.