अवैध बनावट ताडीची तस्करी उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
14

वाशिम, दि. 27  : राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपआयुक्त अमरावती व वाशिमचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांच्या पथकाने वाशिम ते मंगरुळपीर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील अस्थाई रोडजवळ ई-कॉमर्स कुरीअरच्या चारचाकी महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहनातून अवैध बनावट ताडीची विक्री करीत असल्याची गोपीनाय माहिती मिळाली. त्याआधारे सापळा रचून 25 जानेवारीला छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान वाशिम शहरातील अमित गायकवाड, केशव भोयर व मनोहर कुलमी हे तीन आरोपी चारचाकी वाहनात बनावट ताडीची विक्री करतांना आढळुन आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 अे,ई 81,83 व 103 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 328 नुसार गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 7 लक्ष 701 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये निरीक्षक गोपीनाथ पाटील, दुय्यम निरीक्षक किरण वराडे, सहाय्यक निरीक्षक रंजित आडे, जवान सर्वश्री निवृत्ती तिडके, ललीत खाडे, नितीन चिपडे, स्वप्नील लांडे, दिपक राठोड, बाळु वाघमारे व वाहन चालक संजय मगरे यांनी सहकार्य केले.

        जिल्हयात 1 ते 26 जानेवारी या कालावधीत एकूण 26 व्यक्तींविरुध्द अवैध दारु विक्री व वाहतूकीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण 8 लक्ष 58 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हयात कोणत्याही ठिकाणी अवैध बनावट देशी,विदेशी दारु व ताडीची निर्मित्ती, वाहतूक व विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क करावा.असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क, अधिक्षक अभिनव बालुरे यांनी केले आहे.