जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सूचना

0
12

गोंदिया,दि.27 : सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात (12 वी विज्ञान) ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आरक्षित (अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र) प्रवर्गातून जाती दावा पडताळणीचे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे अद्याप पर्यंत सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणी प्रकरण याथाशिघ्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया कार्यालयात सादर करावे. उशिरा आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाही.

        ज्या अर्जदारांनी माहे डिसेंबर 2022 पर्यंत जाती दावा पडताळणीचे प्रकरण सादर केले होते (त्रुटी प्रकरणे वगळून) अशा विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले असून त्यांचे ई-मेलवर पाठविण्यात आले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी/अर्जदारांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलवरुन प्राप्त करुन घ्यावे. तसेच ज्या अर्जदारांनी माहे सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये प्रकरणे सादर केले होते व ज्यांना अद्याप पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत अशा अर्जदारांचे प्रकरणे त्रुटीत असून अशा अर्जदारांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी ई-मेलवर व पोष्ट पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या आहेत. तथापी अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटी पुर्तता केलेली नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारे प्राप्त झालेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी जाती दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी संदर्भात आवश्यक पुरावे व कागदपत्रासह दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यंत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी आयडी वर मुळ स्वरुपात अपलोड करुन त्याच्या प्रती समितीकडे सादर करावे. अर्जदारांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता न केल्यास त्यांचे प्रकरण नस्तीबध्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे राजेश पांडे, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी कळविले आहे.