विजेच्या धक्क्याने तरुण शेतकरºयाचा मृत्यू

0
15

गोंदिया : वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षण व्हावे या हेतूने पिकासभोवतालच्या काटेरी कुंपणाला जिवंत वीज तारांचा प्रवाह जोडला. यात शुक्रवारी (दि. 27) वारव्ही येथील एका तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला, तर एक थोडक्यात बचावला. याप्रकरणी केशोरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केशोरी येथील शेतकरी अरुण मस्के यांच्या शेतात धान रोवणीचे काम सुरू होते. शुक्रवारी 25 पुरुष व महिला मजूर कामावर होते. गुरुदेव कापगते व अरुण मस्के यांचे शेतादरम्यानच्या धुºयावर ठेवलेले पºहे काढताना उपयोगात येणारे लाकडी साहित्य आणण्यासाठी दिनेश शंकर वलके हा मजुर गेला होता. गुरुदेव यांनी आपल्या शेतात तारेच्या कुंपणाला जिवंत विद्युत तार जोडले होते. या तारेला स्पर्श झाल्याने दिनेश शेतात पडला. बराच वेळ होऊनही तो परतला नाही म्हणून त्याला शोधण्यासाठी पांडुरंग बिसन चौधरी धावून आला. त्याने दिनेशला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही विजेचा धक्का बसला. त्याने आरडाओरड केली. कामावर असलेले मजुर गोळा झाले. आरोपीचा मुलगा हेमंत गुरुदेव कापगते हा त्याच शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करता होता तो तिथे आला. त्याने विद्युत तार काढले. लागलीच केशोरी येथून रुग्णवाहिका आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, यात दिनेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.