कुडाळचे नायब तहसिलदार व आंब्रड तलाठील्या ५ ते ६ जणांनी केली लाथ्या बुक्यांनी मारहाण

0
17

सिंधुदुर्ग:-अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कुडाळ केळबाईवाडी मशानभूमी जवळ गस्त घालत असलेल्या नायब तहसीलदार अभिजित हजारे,आंब्रड तलाठी नवीन इनोव्हेशन राठोड यांसह त्यांच्या पथकातील अन्य कर्मचार्‍यांना इनोव्हा कारमधून आलेल्या ५ ते ६ जणांनी शिवीगाळ व दमदाटी तसेच लाथ्याबुक्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व आंब्रड तलाठी नवीन बबन राठोड यांनी फिर्याद दिल्यावरून कुडाळ पोलीसांत भादंवी कलम 353, 332, 504, 506,146,141,147 (37)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस मनोज पाटील करत आहे.

कुडाळ तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याची माहिती नायब तहसिलदार यांच्या पथकाला मिळाल्याने अवैध गौण वाळू खनिज उत्खनन व वाहतूक निर्बंध घालण्यासाठी कुडाळ तहसीलदारांनी स्थापन केलेल्या भरारी पथकातील नायब तहसीलदार अभिजित हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड तसेच त्यांचे सहकारी हे बुधवार दि.१ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता मालवण कुडाळ रस्त्यावरील कुडाळातील केळबाईवाडीतील मशानभूमी जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ४ डंपर तपासणीसाठी रोखून त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे समजताच ५ ते ६ लोक इनोव्हा कारमधून येऊन पथकातील सर्व संबंधितांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथ्या बुक्कांनी मारहाण करायला सुरुवात केली.त्यातही कहर म्हणजे कुडाळ नायब तहसीलदार अभिजित हजारे यांनाही लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे.