लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे स्पर्धा परिक्षेवर व्याख्यान उद्या गोंदियात

0
15

गोंदिया दि.2:येथील पतंगा मैदान स्थित सामाजिक न्याय भवनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष दयानंद मेश्राम यांचे व्याख्यान व मार्गदर्शनाचे आयोजन उद्या शुक्रवारला 3 फेब्रुवारी रोजी केले आहे.

येथील सामाजिक न्याय भवन येथे 2016 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. अभ्यासिका केंद्रात यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, बँक व इतर अनुषंगिक स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यादृष्टीने मौलिक मार्गदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते.या शिबीराचे आयोजन दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मार्गदर्शन व व्याख्यान डॉ. बाबसाहेब सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन येथील सभागृहात आयोजीत असून वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मोहतुरे,स्टुडंटस राईट असो.चे उमेश कोरारम यांनी केले आहे.