नागपूरात पदवीधरनंतर शिक्षक मतदारसंघात मविआने केला भाजपचा पराभव

0
19

नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीत सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपाने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

विशेष म्हणजे यापुर्वी सुद्दा महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा असलेला बालेकिल्ला ढासळून पाडला होता.आता शिक्षक मतदारसंघातूनही आरएसएस मुख्यालय असलेल्या नागपूरातून भाजपला मतदारांनी दाखवलेली जागा ओबीसीवरील अन्यायाचा प्रतिशोध असल्याचे बोलले जात आहे.कपील पाटील यांच्या शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना मात्र पावणेतीन हजार मतावरंच समाधानी रहावे लागले.अडबाले यांना 16500 मते मिळाली, तर गाणार यांना 6366 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार 6309 मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.

महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पक्षभेद न मानता सर्व शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार, अशी प्रतिक्रिया विजयानंतर दिली.आता पुढच्या काळात मी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. नागपूरच्या जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात ही निवडणूक असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अडबाले यांच्या विजयाने काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला.