नोकरीच्या नावावर ११.५ लाखांनी गंडविले, तिघांवर गुन्हा दाखल

0
28

गोंदिया- नोकरी लावून देण्याच्या नावावर ११ लाख ५0 हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन आरोपींवर तिराडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश गायधने (वय ३८) रा. नवेझरी ता. तिरोडा, सचिन डोंगरे (वय ३८) रा. तिरोडा आणि बाबूलाल मडावी (वय ४५) रा. देवरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे.
वर्धा एम्युनिशन डिपो येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपिंनी तक्रारकर्ता शिवनाथ गेडाम (वय ४३) रा. पारसनगरी यांच्याकडून ११ ऑक्टोबर २0१७ ते १३ नोव्हेंबर २0१७ दरम्यान शिवनाथ गेडाम व त्यांची पत्नी आणि एका जणाकडून ११.५0 लाख रुपये घेतले. दरम्यान, आरोपींनी बनावट मुलाखतपत्र देऊन मुलाखतही घेतली. यानंतर एका कोर्‍या कागदावर स्वाक्षरी घेतली. मात्र, हा सर्वप्रकार बनावट असून, फसगत झाल्याचे समजताच गेडाम यांनी तिरोडा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हनवते करीत आहेत.