विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज करणाºया रोमिओला अटक

0
25

गोंदिया : एका 19 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज करणाºया तसेच छेड काढणाºया रोमिओला दामिनी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
एका 19 वर्षीय तरुणीस एक तरुण (रोमिओ) मागील दोन महिन्यांपासून सतत तरुणीच्या मोबाइलवर डार्क वेबचा वापर करून इंटरनेट कॉलिंग, कॉल बॉम्बिंग, स्पूफ कॉलिंग, बल्क मेसेजिंग, इमेज मोर्फिंग, सायबर स्टॉकिंग इत्यादी तंत्रज्ञान विषयक वेगवेगळ्या माहितीचा उत्तमरित्या वापर करून आंतरराष्ट्रीय क्रमांकादवारे कॉल करून, व्हॉट्सपवर अश्लील मैसेज करून लैगिक सुखाची मागणी करून तसेच ब्लॅक मेल करून तरुणीस मानसिक त्रास देत होता. तरुणीने त्याच्या गोष्टींना वारंवार नकार व विरोध करून सुद्धा तरुण हा तरूणीस, तसेच तिच्या घरच्यांना त्रास होईल, तसेच समाजात तरुणीची बदनामी करण्याचे षडयंत्र करीत होता. याबाबत सदर तरुणीने कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील प्रभारी म.पो.उप.नि प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनात पो.शि अंबादे, बावणकर, चा.म.पो.शि.पाचे, पो. शि.सपाटे, भैसारे यांनी तरुणीच्या तक्रारीची शहानिशा केली असता 6 फेब्रुवारी रोजी तरुणाने तक्रारदार तरुणीस आंतरराष्ट्रीय क्रमांकाद्वारे कॉल करून एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले असता दामिनी पथकाने सापळा रचून त्या तरुणास रंगेहाथ पकडले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणास विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाबावरून त्रास देणाºया तरुण रोमिओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.