दुर्मीळ खवले मांजर जप्त,वनविभागाच्या संयुक्त पथकाची कारवाई

0
18

भंडारा दि. 8 : 7 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भंडारा व नागपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर(Indian Pangolin) या वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे अनुसूची 1 मधील अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना बनावट ग्राहक बनुन सापळा रचुन आरोपी नामे 1)  रामेश्वर माणिक मेश्राम रा. तिड्डी पो. मानेगांव ता. जि. भंडारा, वय – ३२ वर्ष, व २)  सचिन श्रावण उके रा. खमारी (भोसा) पो. नेरी ता मोहाडी जि. भंडारा वय-२९ वर्ष, यांना अटक केली. आरोपींकडून १९.९१५ कि.ग्रॅ. वजनाचे जिंवत नर खवले मांजर (Indian Pangolin) जप्त करण्यात आले.

ही कारवाई नागपूर वनविभागाचे प्रितमसिंह कोडापे, विभागीय वनाधिकारी ( दक्षता) यांच्या नेतृत्वाखाली  प्रमोद वाडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा, आय एम सैय्यद, क्षेत्र सहायक भंडारा, श्री एन डी तवले वनरक्षक,संदिप धुर्वे वनरक्षक, दिनेश शेंडे वनरक्षक, योगेश ताळाम वनरक्षक, दिनेश पवार वनरक्षक,ए एन नरडंगे बिटरक्षक डोडमाझरी,एन जी श्रीरामे, एस एस कुकडे, वनरक्षक, एन एम नागरगोजे वनरक्षक, श्री अनिल शेळके वाहनचालक, राजु वानखेडे वाहनचालक यांनी  संयुक्तरित्या पार पाडली.

या प्रकरणाचा पुढील तपास रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर, राहुल गवई उपवनसंरक्षक, भंडारा यांच्या मार्गदर्शनात साकेत शेंडे, प्रभारी सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) भंडारा, विवेक राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक भंडारा हे करित आहेत. तसेच भंडारा वनविभागातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की,वन्यप्राण्यांच्या शिकारी बाबत काहीही माहिती असल्यास वनविभागास माहिती द्यावी किंवा वनविभागाचे टोल फ्री क्र.१९२६ वर कळवावे,असे  उपवनसंरक्षक, वनविभाग भंडारा यांनी कळविले आहे.