गोंदियात 6.73 लाखाचा 33 किलो गांजा जप्त

0
24

गोंदिया,दि.20 : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या गौतमनगर परिसरातील एका घरात छापा घालून अवैधरित्या बाळगलेला 33 किलो गांजा जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे यांना खुशाल उर्फ पप्पु अगडे रा. नगर गोंदिया याने विक्री करीता अवैधरित्या गांजाचा साठा राकेशसिंग उर्फ बंटी खतवार (ठाकूर) याचे वाजपेयी वॉर्ड गौतम नगर, गोंदिया येथील घरात करुन ठेवल्याची माहिती मिळाली होती.त्या माहितीचा आधार घेत वरिष्ठाच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील मौजा वाजपेयी वार्ड गौतम नगर गोंदिया येथील घरी ( 19 फेब्रुवारी रोजी 7.45 वा. ) शासकीय पंच, पो. स्टाफ, कारवाईस लागणारे सर्व आवश्यक साहित्य सोबत घेऊन रवाना होवून अवैधरित्या गांजाची साठवणूक प्रकरणी छापा घालून धाड कारवाई केली.
इसम नामे राकेश सिंग उर्फ बंटी खतवार (ठाकूर) रा. वाजपेयी वॉर्ड, गौतम नगर गोंदिया हा मिळून आला. त्यास पोलीसांची ओळख देवून त्यास येण्याचे कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहिती प्रमाणे त्याचे समक्ष त्याचे राहते घराची शासकीय पंचासह पाहणी करून झडती घेतली असता, त्याचे राहते घराचे मधल्या क्र.2 खोलीत सिमेंट ने तयार केलेल्या सज्ज्यावर दोन प्लास्टिक पॉलीथीन च्या गठ्यामध्ये प्लास्टिक पॉलीथीनचे वेस्टन, आवरान करून पॅकिंग केलेले एकूण 30 नग पॅकेट, ज्या मध्ये एकूण वजनी 33 किलो 688 ग्रॅम, ओलसर हिरव्या रंगाचा उग्र वास येत असले ला गांजा किंमती एकूण 6 लाख 73 हजार 760 रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. वरिष्ठांचे निर्देशानुसार सदर चे धाड कारवाईची सविस्तर जप्ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
अवैधरित्या मिळून आलेला जप्त गांजा आरोपी सह पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई ची प्रक्रिया गोंदिया शहर ठाणे पोलीस करीत आहेत. अवैधरित्या गांजाची विक्री करीता साठवणूक करून बाळगल्या प्रकरणी आरोपी नामे 1 ) खुशाल उर्फ पप्पु अगडे रा. श्रीनगर र्गोंदिया ( फरार ), 2) राकेशसिंग उर्फ बंटी राजुसिंग खतवार (ठाकूर) वय 38 वर्षे रा. वाजपेयी वार्ड, गौतम नगर गोंदिया यांचे विरूध्द पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे फिर्याद वरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे कलम 8 (क), 20, 29 एन डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची उत्कृष्ठ दर्जेदार कारवाई वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात व उपस्थित, पो.अंमलदार स. फौ. अर्जुन कावळे, पो. हवा. राजू मिश्रा, भूवनलाल देशमुख, चेतन पटले, नेवालाल भेलावे, संतोष केदार, अजय रहांगडाले, मपोशी कुमुद येरणे, चा. पो. शि मुरलीधर पांडे, यांनी कामगीरी केलेली आहे.