महाशिवरात्री पर्वावर नागरा येथील प्रसिद्ध हेमाडपंथी प्राचीन शिव मंदिरात भाविकांची गर्दी

0
18

गोंदिया,दि.20ः-वृक्षधरा फाउंडेशन चे सहसंस्थापक “नितेशजी बारेवार” यांच्या आग्रहावर गोंदिया जिल्हाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,आणि वृंदावन येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पूज्य देवी प्रतीभाजी यांनी शिव मंदिर नागराधाम इथे भेट देऊन श्री पंचमुखी नागरेश्वर महादेवाचे दर्शन प्राप्त करून आशिर्वाद प्राप्त केले.
आणि मंदिर व्यवस्थेबद्दल निरीक्षण केले.

वृक्षधरा फाउंडेशनचे सर्व स्वयसेवकांनी नागराधाम वृक्षधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश दमाहे यांच्या नेतृत्वात पूर्ण महाशिवरात्री मध्ये सर्व स्वयसेवकानी पूर्ण 48 तास निस्वार्थ भावाने निरंतर शिव मंदिर गाभाऱ्यात,आणि पूर्ण मंदिर परिसर मध्ये विविध कामात निरंतर सहकार्य केले.यामध्ये “हर मष्टिस्क्या तिलक अभियान अंतर्गत वृक्षधरा फाउंडेशन चे स्वयंसेवक अजय लील्हारे मित्र परिवारने सर्व भाविकांना निःशुल्क त्रिकुंड महाकाल तिलक लावण्यात आले.आणि शिव मंदिर परिसरात विविध प्रकारचे सेवक मित्र परिवारनी भाविकांना महाप्रसाद मध्ये पुलाव,पोहा,छांछ वितरीत करण्यात आले, सौरभ रोकडे मित्र परिवार,नगर उत्सव समिती दुर्गा चौक,अक्की सचदेव ग्रुप,महाकाल मित्र परिवार कान्हा यादव ग्रुप,आणि खूप लोकांनी आपल्या क्षमतेप्रमाणे प्रसाद वितरीत केले.
यामध्ये निरंतर 31 वर्षापासून नागराधाम शिव मंदिर बाहेर सर्व भाविकांसाठी निःशुल्क जुते चप्पल स्टँड , जनचेतना युवा मंच,अशोक गप्पू गुप्ता मित्र परिवार यांच्या कडून ही निरंतर सेवा देण्यात येत आहे.याबद्दल वृक्षधरा फाउंडेशन आणि श्री शिव शंकर मंदिर ट्रस्ट नागराधामने महाशिवरात्री पर्वामध्ये ज्यांनी सेवा दिली, त्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

आणि विशेष म्हणजे सर्वात भाविकांना आवडणारा मंदिर परिसरात प्रेक्षणीय स्थळ म्हणून सध्याचं वृक्षधरा फाउंडेशन संकल्पनेने साकार झालेले “श्री शिवनगरी नागराधाम LED बोर्ड इथे भाविकांची प्रचंड गर्दी होती आणि त्यांना हे खूप आवडले.