गावठी कट्टयासह एका युवकास अटक

0
29

रामनगर पोलिसांची कारवाई
गोंदिया-गावठी कट्ट्यासह एका युवकास रामनगर पोलिसांनी जेरबंद केलेआहे. श्रेयस उर्फ चिंटू राजेश खोब्रागडे (19) रा . सूर्याटोला रामनगर गोंदिया, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यां विरुद्ध कारवाई करणेबाबत निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचे नेतृत्वात पोलिस पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरुद्ध शोध घेऊन मोहिम राबविण्यात येत आहे.
संबंधाने रामनगर पोलिस गुन्हे प्रकटी करण पथक अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना पथकातील पोलिस अंमलदार श्याम राठोड यांना आज गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रेलटोली परिसरात एक युवक त्याच्याकडे गावठी कट्टा,पिस्तूल सारखे घातक शस्त्र बाळगून फिरत आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलिस पथकाने तात्काळ युवकाचा शोध घेऊन रामनगर हद्दीतील रेल्वे स्टेशन मालधक्या जवळ आरोपी श्रेयस उर्फ चिंटू खोब्रागडे हा संदिग्ध स्थितीत आढळला. त्याची पोलिसांनी अंग झडती घेतली असता पॅन्टच्या खिशात कमरेला लपवून गावठी कट्टा मिळून आला.गावठी कट्टा 9 एमएमबोअर असलेला 18 सेंटिमीटर लांबीचां , 9 सेंटीमीटर लांब लाकडी मूठ असलेला किमत अंदाजे 12 हजार रुपये असल्याचेे सांगितले जाते.श्रेयसची अधिक विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही , तसेच शस्त्र बाळगण्याबाबत परवाना नसल्याने गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास रामनगर, पोलिस करीत आहेत.