प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची जिल्ह्यात भरारी

0
34

गोंदिया- मातामृत्यू ,बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला लॉकडाउन काळातही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याला सदर योजनेचे ५५,७१६ नोंदणी उद्दीष्ट्ये देण्यात आले होते. जिल्ह्याने दि.२0 फेब्रुवारी २0२३ अखेरपयर्ंत ५७,२१७ मातांची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत नोंदणी झालेली असून, १0३ नोंदणी उद्दिष्ट्ये पूर्ण करून जिल्ह्यात भरारी घेतली आहे. मातांच्या बँक खात्यावर २४ कोटी ८४ लाख ४९ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात १,६३,३४५ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत अर्ज प्राप्त झालेले असुन १,५0,२00 माताना अजार्नुसारया योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.या योजनेमुळे महिलांची बँक खाते संख्या वाढली आहे तसेच बाळाच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. संपूर्ण दारिद्ररेषेखालील व दारिद्ररेषेवरील अनेक गरोदर महिला ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात, अशा मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूती झाल्यावर ही लगेच काही काळात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
रोज मजुरी करीत असताना अधिक शारीरिक क्षमतेचे काम केल्यामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची जन्माला येतात व कुपोषणाचे सत्र मातेपासून बालकापर्यंत रितसर ओढवले जाते. याची दखल घेत शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केलेली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या आधार सीडेड बँक खात्यात तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपये अदा केले जातात. या योजनेसाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड,लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ची जोडलेले बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५0 दिवसाच्या आत नोंदणी, बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरणाच्या प्रत्येकी आवश्यकता असते. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील,तसेच खाजगी नोकरीतील ज्या मातांना पगारी प्रसूती रजा मंजूर आहे, अशा मातांना ही योजना लागू होत नाही.
मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका – सेवक, आरोग्य सहाय्यक- सहायीका हे लाभार्थ्यांना प्रेरित करीत असून तालुका कार्यक्रम सहाय्यक, तालुका समूह संघटक, वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा समूह संघटक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी, डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांच्या सहाय्याने अर्ज भरून घेण्याकरिता प्रयत्न करीत आहेत.
जिल्हास्तरावरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एन.एच.एम.) कु.अर्चना वानखेडे व जिल्हा कार्यक्रम समन्वयक कैलास खांडेकर तालुकास्तरावरुन सर्व तालुका आरोग्य अधिकारी वेळोवेळी पाठपुरावा करीत असतात.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी पहिल्या खेपेच्या मातांना शासनाकडून मिळालेले वरदान या स्वरूपात असून जिल्ह्यातील माता व बाल मृत्यू दर कमी करण्यास योजना कारणीभूत ठरली, असे सुचवलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पहिल्या खेपेच्या मातांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान प्रधानमंत्री मातृवंदना जिल्हा कार्यक्रम समन्वयक कैलास खांडेकर यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्हा करेक्शन क्यु मध्ये तिसर्‍या क्रमांकावर असल्याने ते कमी करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनाकडुन प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान शिल्लक लाभार्थि करिता शिबिरे आयोजित केलेले आहेत तरि सर्व लाभार्थि यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आलेले आहे. जिह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजने बाबत जनजागृती प्रशांत खरात जिल्हा आय.ई.सी. अधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र गरोदर माता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील राहतील असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी केले आहे.