आमगाव तहसील कार्यालाच्या शिपायाच्या आत्महत्येचा प्रयत्न

0
42

आमगाव,दि.27,ः येथील येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका शिपायाने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज 27 फेब्रुवारीला दुपारी घडली.राकेश बोरकर असे शिपायाचे नाव आहे.या प्रकाराने तहसील कार्यालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
येथील तहसील कार्यालयात मागील ऑगस्ट महिन्यांपासून राकेश शिपाई पदावर कार्यरत आहे.अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे मागील सहा महिन्यांपासून राकेशचे वेतन झालेले नाही.सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने राकेश आर्थिक सकंटात सापडला.यातच त्याच्यावर झालेली उधारी मागणार्‍यांचा सतत तगादा,उधारीची रक्कम वाढल्याने कोणीही उधार देण्यास तयार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न राकेश समोर निर्माण झाला.आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत राकेश होता.परिणामी आर्थिक विवंचनेत राकेशने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी आणि विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी त्याची समजूत काढत झाडावरुन खाली उतरविले.