घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 लाखाचा मुद्देमाल फिर्यादीस परत

0
30

गोंदिया,दि.18ः- शहर पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेला २ लाख ९,०००/- रूपयाचा मुद्देमाल मूळ मालकास न्यायालयाच्या आदेशाने पोलीस अधिक्षकांच्या परवानगीने परत केले.सविस्तर असे की, ०५/१०/२०२२ फिर्यादी सुमित अशोक उईके, रा. आर.पी.एफ. कॉर्टर, पोस्ट ऑफीस जवळ, गोंदिया, हे दिनांक ०५ ते ०७/१० / २०२२ पर्यंत बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन लोखंडी कपाटातील  सोन्याचा दागिने नेकलेस, टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र ,लॉकेट ,आंगठी, चैन ,कनोती व चांदीचे पैंजण असा एकुण किमती २,०२०००/- रुपयाचा मुद्देमाल सोन्या – चांदीचे दागिने चोरी केले.त्या चोरीची तक्रार गोंदिया शहर पोलिसात अप.क्रं.६३९/२०२२, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले होते.त्या तक्रारीच्या अनुषंगाने गोंदिया शहर चे पो. नि.चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे  सोनु गोपाल चव्हाण वय ३८ वर्ष, रा. गौशाला वार्ड, गोंदिया, राजेश भरत गायक वाड वय ४० वर्ष,रा.सेंदुरवाफा, जि. भंडारा, मनिष ऊर्फ बुच्ची मनु कुलदिप वय २३वर्ष, रा. दसखोली, गोंदिया यांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन अटक केली होती.सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान नमूद तिन्ही आरोपी यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे दागिणे नेकलेस, टॉप्स लॉकेट, सोन्याची आंगठी, सोन्याची २२ नग मनी लहान व चांदीचे पैजन ४ नग, एक सोन्याचे लॉकेट , एक सोन्याची चैन ,पेन्डल, सोन्याची कनोती असा एकुण २,०९,०००/- रुपयाचा मुद्देमाल दागिने गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आले होते.१७ मार्च २०२३ रोजी न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी सुमित अशोक उईके, वय २९ वर्षे, रा. आर. पी. एफ. कॉर्टर, मेन पोस्ट ऑफीस जवळ, गोंदिया, यांना पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे (परत) देण्यात आले.

वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे .गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथका चे स.पो.नि. सागर पाटील, पो. हवा. जागेश्वर उईके, मपोहवा- रिना चौव्हाण, सतिश शेंडे,प्रमोद चव्हाण, दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी कामगिरी केलेली आहे . जप्त मुद्देमाल दागी ने परत मिळवून दिल्याबद्दल मुळ मालक फिर्यादी यांनी पोलीस विभागाचे आभार मानले.मुख्य बाब म्हणजे वरील घरफोडीच्या गुन्ह्या तील तिन्ही आरोपी हे दिनांक- १८/११/२०२२ पासून न्यायालयकस्टडी मध्ये आहेत.