सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे अंतर्गत दादालोरा खिडकी योजनेंतर्गत आरोग्य शिबिर

0
20

गोंदिया,दि.18ः- पोलीस विभागाच्यावतीने कम्युनिटी पोलीसिंग च्या माध्यमाने ” दादा लोरा खिडकी ” योजने अंतर्गत पोलीस ठाणे चिचगड मार्फत सशस्त्र दूरक्षेत्र पिपरखारी, बोंडे येथे आरोग्य शिबिर, नेत्र शिबिराचे आयोजन करुन तपासणी करण्यात आली.या शिबिरात 200 वर सामान्य नागरिकांनी लाभ घेतला.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली “पोलिस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून दादलोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरता आयोजित गोंदिया जिल्हा पोलीस दल व डिजिटल ग्रामिण सेवा केंद्र यांचे सौजन्याने १७ मार्च रोजी आभा कार्ड, आयूष्यमान कार्ड व आधारकार्ड अपडेट योजनेचा लाभ शिबिर कॅम्प सशस्त्र दुरक्षेत्र पिपरखारी येथे नागरिकानी घेतला.

सदर कॅम्पला उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर,पोलीस स्टेशन चिंचगडचे ठाणेदार शरद पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.आयोजित कॅम्पला अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कॅम्प मध्ये अंदाजे १८० ते २०० सामान्य नागरिकांनी सह भाग घेतला. तसेच एकूण ७७ नागरिकांचे समस्याचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारचे शासकीय सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे घेण्यात आले असून लवक रच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदरचा उपक्रम हा ICICI फाउंडेशन व्हिजन स्प्रिंग, पुणे येथील डॉ.ध्यानपाल यादव, कॉर्डिनटर अक्षय वर्मा,काँसलेर सुनील पिंगळे व मोहित शहारे व त्यांची टीम यांना पाचारण करून दादालोरा खिडकी याजनेच्या माध्यमातून आयोजन करून नक्षलग्रस्त भागातील लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून ग्राम बोंडे, पळसगाव, धमदिटोला, तुमडीमेंढा व करुझरी येथील आदिवासी महिला-पुरुष यांनी नेत्र तपासणी शिबिरात सहभाग नोंदविला.नेत्र तपासणी उपक्रमा दरम्यान एकूण 211 महिला – पुरुष यांचे डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला आहे..
सदर उपक्रम दरम्यान डॉक्टर व त्यांची चमू यांचे दुपारचे जेवणाची वेवस्था AOP बोन्डे येथे करण्यात आली.