भाजीपाला घेऊन घराकडे जाणाऱ्या सहाय्यक फौजदाराला भरधाव कटेनरने चिरडले

0
36

भंडारा : बाजारातून भाजीपाला घेऊन घराकडे जाणाऱ्या सहाय्यक फौजदाराला भरधाव कटेनरनं चिरडल्याची घटना भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अगदी पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता घडली. राजपूत मते (56) असं अपघातात मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असून भंडारा पोलीस मुख्यालयात पोलिस क्वार्टरमध्ये राहतं होते. मुजबी ते कारधापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी फार अडचणीचा ठरत असून रोडच्या दोन्ही बाजूला साईडिंग धोक्याची बनली आहे. त्यामुळं इथून मार्गक्रमण करताना छोट्या वाहनधारकांचा अनेकदा अपघात होऊन जीव गेले आहेत. काल, याच मार्गावरील नागपूर नाका चौकात भरधाव टिप्पर ने आजोबा आणि नातीला चिरडल्यानं दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता.