33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता देवदर्शनाला निघाले अन्… भीषण अपघातात बालकाचा मृत्यू

देवदर्शनाला निघाले अन्… भीषण अपघातात बालकाचा मृत्यू

0
43

बुलढाणा: संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या लोणार येथील निखाडे कुटुंबीयांच्या वाहनाला झालेल्या अपघातात जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर पत्नी, मुलगा, चालक गंभीर जखमी झाले. या अपघातात नागपूर येथील दोघे जण जखमी झाले आहे.लोणार येथील गजानन निखाडे हे आपल्या परिवारासह (एमच ४६ डब्ल्यू ३८३३ क्रमांकाच्या) मारोती अल्टो कारने शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. दरम्यान, घरून निघून जेमतेम अर्धा तास होत नाही तोच काळच त्यांना आडवा आला. मेहकर जालना रस्त्यावर चिंचोली बोरे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला नागपूर येथून येणाऱ्या (एमएच ४६ एन ४५३४) स्कॉर्पिओने धडक दिली. अपघातात अल्टोमधील आर्यन गजानन निखाडे(१० वर्षे) हा ठार झाला तर त्याची आई सविता गजानन निखाडे (३५), जुळा भाऊ अंश गजानन निखाडे (१० वर्षे), चालक अंकुश उद्धव अवचार (३१) व स्कॉर्पिओमधील सुयोग परसराम भुके, अक्षय डिगांबर रनगारी (रा. नागपूर) हे जखमी झाले आहेत.