गोंदियात ट्रकच्या धडकेत तीन ठार; बापलेकांसह एका चिमुकलीचा समावेश

0
51

गोंदिया,दि.1-. नातलगाकडील लग्न सोहळा आटोपून आपल्या पत्नी, नातलगाची मुलगी आणि दोन मुलांना घेवून दुचाकीने वडिल निघाले असता भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परने धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले दोन चिमुरडे आणि इतर बालिकेचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाली 11 वाजेच्या सुमारास घडली. तर जखमी वडिलाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ही हृदयद्रावक घटना गोंदिया नजीक असलेल्या ढाकणी येथे आज शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. आदित्य बिसेन (वय 7), मोहित बिसेन (वय 11), कुमेंद्र बिसेन (वय 37) सर्व रा. दासगाव आणि आरवी कमलेश तूरकर (वय 5, रा. चुटिया) अशी मृतांची नावे आहेत. अपघतानंतर ट्रक चालक घटना स्थळावरुन पसार झाला.माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर ट्रक (एमएच 35, के 0298) चालकाविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे.

तालुक्यातील दासगाव येथील कुमेंद्र बिसेन आपल्या कुटुंबियांसह गोंदिया शहरानजीक असलेल्या ढाकणी येथे लग्न कार्याकरिता नातलगाकडे आले होते. लग्न कार्य आटोपल्यानंतर दुचाकीने ते आज शनिवारी दुपारी आदित्य बिसेन आणि मोहित बिसेन, आरवी कमलेश तुरकर आणि पत्नीला घेवून भागवतटोला मार्गाने दासगाव आपल्या गावाला जाण्यासाठी कुमेंद्र बिसेन सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास निघाले होते.